आरोपी काही तासातच ताब्यात
मंडणगड:-तालुक्यातील अडखळ ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच यांच्या टाकवली गावातील बंद घर फोडून चोरट्यांनी 1 लाख 60 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व दोन हजार रूपयांचा मोबाईल लांबवला. यानंतर मंडणगडातून पलायन करण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्याच्या पोलिसांनी काही तासातच सापळा रून मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून लपवून ठेवलेला मुद्देमाल ताब्यात घेतला असून पोलिसांया या कामगिरीचे कौतुक होत आहे. यासंदर्भात टाकवली येथे राहणार्या अडखळच्या सरपंच करिना कल्पेश रक्ते यांनी मंडणगड पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करिना रत्ते या गुरूवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपले घर बंद करुन गावातील शेतामध्ये शेतीच्या कामासाठी निघून गेल्या होत्या. संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्या घरी आल्या असता घराचा समोरील दरवाजा उघड्या अवस्थेत असलेला त्यांना दिसून आला. घराच्या दरवाज्यास लावलेले कुलुप तोडून खाली टाकलेले दिसले. यानंतर त्यांनी घरामंध्ये शिरुन पाहीले असता कपाटात ठेवलेले सुमारे एक लाख साठ हजार रुपये किंमतिचे सोन्याचे दागिने व दोन हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरट्याने चोरुन नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी तत्काळ मंडणगड पोलीस ठाणे गाठले व आपली तक्रार दाखल केली.
तक्रार दाखल झाल्यानंतर रात्री नऊ वाजल्यानंतर पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्ताराम बाणे यांनी गुह्याचा तत्काळ तपास सुरु केला. बसस्थानकाच्या आवारात रात्री एक वाजण्याच्या सुमारास एक इसम संशयित रित्या फिरताना दिसून आला. त्याला विचारणा केली असता त्यांने उडावा-उडवीची उत्तरे दिल्याने त्याची अंग झडती घेण्यात आली. यावेळी टाकवली येथील गुह्यातील चोरीचा मुद्देमाल त्याच्या ताब्यात असल्याचे पोलीसांना आढळून आले. त्यामुळे अंकुश दौलत रेवाळे (वय 42, रा. टाकवली) यास मुद्देमालासह ताब्यात घेत अटक करण्यात आली. याप्रकरणी संबंधित चोरट्याविरोधात भादंविक कलम 454, 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा यशस्वी तपास पोलीस निरिक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नामदेव शिदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ताराम बाणे, वैभव गमरे, पोलीस पाटील रमेश जाधव, सत्यजीत बिजन यांनी केला. पोलिसांनी या चोरीरीप्रंकरणी दाखलेल्या तटपरचे तालुक्यातून कौतुक होत आहे.