रत्नागिरी:-संगमेश्वर तालुक्यातील कमळजाबाई पांडुरंग मुळ्ये हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कोळंबे येथे एस.आय. ग्रुप कंपनी व सेवा सहयोग फाऊंडेशन मुंबई यांच्या सदिच्छा भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शाळेला व गुरुकूल वसतिगृहाला भौतिक सुविधा प्राप्त करुन देणाऱ्या या कंपनीने गुरुकुल वसतिगृहाला भेट देऊन समस्या जाणून घेतल्या. यावेळी कंपनीने काही समस्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी एस. आय. गुप कंपनी व सेवा सहयोग फाऊंडेशनतर्फे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी एस आय ग्रुपचे सेक्रेटरी सचिन अणेराव, सेवा सहयोग फाऊंडेशनचे पदाधिकारी दिपाली देवळे, सिनिअर पोग्राम मॅनेजर विशाल देसाई, असिस्टंट पोजेक्ट मॅनेजर राम रोकडे, प्रोजेक्ट मॅनेजर साईकिरण, प्रोजेक्ट असिस्टंट, संस्थेचे अध्यक्ष नयन मुळ्ये, सचिव दिलीप मुळ्ये, अमोल पाटणे, डॉ. विनायक पेठे, शैलेश डांगे, मुख्याध्यापक संजय मुळ्ये, अधीक्षक जुवेकर, सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन खांबे, चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन कु. तनुजा लिंगायत हिने केले तर आभार खांबे यांनी मानले.