खासदार नारायण राणे यांचा इशारा
रत्नागिरीतच चौपदरीकरणाचे काम अडकले याचे कारण टक्केवारी घेणारे अधिक आहेत
राजापूर:-रिफायनरी विरोधकांनी समोर यावे, आता रिफायनरीला विरोध कराच, विरोध करणारे या जिल्ह्यातून परत जाणार नाहीत असा इशारा देताना जे स्थानिक रिफायनरीला विरोधक करत असतील तर त्यांना प्रथम जिल्हा सोडून जाण्यास सांगा, असा सणसणीत टोला खासदार नारायण राणे यांनी राजापूर येथे लगावला. तर रिफायनरीला विरोध करणारे हे पाकीट बहादुर आहे. असे सांगताना आता रिफायनरी होणारच अशी स्पष्ट भूमिकाही खा.राणे यांनी यावेळी मांडली.
राजापूरातील पुरस्थितीची पाहणी करण्यासाठी खासदार नारायण राणे राजापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी राजापूर भाजपाच्यावतीने खासदार म्हणून निवड झाल्यानंतर प्रथम राजापूरात खा.राणे येणार असल्याने त्यांचा सत्कार व भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा राजापूर शहरातील नगर वाचनालय सभागृहात आयोजीत केला होता. यावेळी ते बोलत होते. पुढे त्यांनी अतिवृष्टीत आलेल्या पुरामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना त्वरीत नुकसान भरपाई दिली जाईल तर वासुकाका पुल हा वर्षाभरात पूर्ण होऊन नागरीकांना याचा त्रास सहन करावा लागणार नाही अशी ग्वाही दिली.
यावेळी उध्दव ठाकरे यांच्यावर टिका करताना यापुढे आम्ही उध्दवमिया म्हणूनच संबोधणार असल्याचे सांगितले. उध्दवमियांना नागरीकांचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी, नागरीकांच्या पोटासाठी राजकारण करावे. आपल्या तालुक्याचा सर्वागिण विकास हा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक परीस्थितीतुन होत आहे. याच धरतीवर कोकणचा विकास करणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले.
आपण साहेब नसून महाराष्ट्रातील तमाम जनतेचा सेवकच राहणार आहे. माझ्यासाठी कोकण महत्वाचा असून कोकणातील नागरीकांचे दरडोई उत्पन्न वाढण्यासाठी प्रयत्न असणार आहेत. मुंबई गोवा महामार्ग संदर्भात सांगताना त्यांनी सिंधुदूर्गात रस्त्याचे काम सुरळीत झाले मात्र रत्नागिरीमध्येच का अडकले तर इथे ठेकेदारी व टक्केवारी अधिक घेणारे आहेत म्हणून काम रखडले असा टोला कोणाचे नाव घेता लगावला. यापुढे माझ्या मतदार संघात होणारे कोणतेही काम दर्जेदार झाले पाहीजे. दर्जाहिन काम करणाऱ्याची गय केली जाणार नसून त्यांना ब्लकलिस्ट दाखविली जाईल असे सांगितले.
राजापूर मतदार संघात सद्या आंधळ दळतय कुत्रा पिठ खातय हे कोण खात आहे हे आपणच पहा असेही यावेळी कोपरखळी मारली. विकास हा होणारच आणि तो आम्ही करणार यामध्ये आपण शंका बाळगू नये. येथील तरूणाना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार, तरूणांच्या शिक्षणाचा दर्जा कसा वाढेल याकडेही लक्ष दिले जाईल अशी ग्वाही दिली. शेवटी त्यांनी तरूणांना संदेश देताना त्यांना पैसा मिळविण्यासाठी लाज हा शब्द आला नाही पाहीजे असे सांगितले.
यावेळी व्यासपिठावर माजी खासदार निलेश राणे, विधानसभा क्षैत्रप्रमुख उत्का विश्वासराव, जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र नागरेकर, सरचिटणीस अनिल करगुंटगर, पदेश सचिव सौ.शिल्पा मराठे, तालुकाध्यक्ष सुरश गुरव, भास्कर सुतार उपस्थित होते. यावेळी माजी खासदार निलेश राणे, विधानसभा क्षेत्रप्रमुख उत्का विश्वासराव यांनीही मार्गदर्शन केले.