मुंबई:-बहूचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज इंग्रजीमध्येच भरण्याचे बंधनकारक होते. मात्र बहूतांश अंगणवाडी कार्यकर्तीना याबाबतची अडचण येत असल्याची बाबा शिरूरअनंतपाळ तालुक्यातील अंगणवाडी कार्यकर्तीच्या शिस्टमंडळाने भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या लक्षात आणून देताच त्यांनी थेट मुख्यमंत्र्यानाच फोनद्वारे ग्रामीण भागातील अडचण लक्षात आणून दिली.
लागलीच आज सकाळी याबाबतचे बदल केल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांना कळवल्याने आता मराठीतही अर्ज स्विकारले जाणार असून याचा लाभ सत्तर टक्के मराठीत अर्ज भरलेल्या महीलांना होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर या निर्णयाचा फायदा होणार आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज मोठ्या प्रमाणात भरण्यात येत असून निलंगा विधानसभा मतदार संघातून विशेष शिबिराचे आयोजण प्रशासकडून केले आहे. अंगणवाडी कार्यकर्ती व सेविकांना हा अर्ज इंग्रजीत भरण्यासाठी मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत होते. अनेकांनी अर्जही इंग्रजीमध्ये भरल्याने अशा महीलांचे अर्ज मंजूर होणार की नाही याबाबतची शंका निर्माण झाली होती.
मात्र शिरूरअनंतपाळ तालुक्यातील अंगणवाडीच्या शिस्टमंडळाने अरविंद पाटील निलंगेकर यांची भेट घेऊन अडचण लक्षात आणून दिली. निलंगा तालुक्यातील तसेच लातूर जिल्ह्यातील बऱ्याच महिलांनी मुख्यमंत्री लडकी बहीण योजनेचे अर्ज मराठी मध्ये भरले होते. मात्र शासनाच्या सूचनेनुसार ते अर्ज इंग्रजीमध्ये असल्याशिवाय स्वीकारले जाणार नव्हते.
ही बाब अरविंद पाटील निलंगेकर यांना समजल्याबरोबर त्यानी लगेच प्रशासनाची चर्च करून मा.ना. मुख्यमंत्री महोदयांना फोनवर संपर्क साधून मराठीमध्येच अर्ज मंजूर करण्याच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना द्याव्यात अशी विनंती केली होती.
मुख्यमंत्री कार्यालयातील कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी ही अडचण लक्षात घेत मुख्यमंत्री कार्यालयाकडून तत्काळ दख्खल घेऊन मराठीमध्ये अर्ज भरण्याबात सूचना संबंधितांना दिल्या व केलेले बदलही निलंगेकर यांना कळवल्याने जवळपास ७०% महिलांचे रिजेक्ट होणारे अर्ज पहिल्या टप्प्यात मंजूर होऊन लवकरात लवकर त्याना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिणार आहे.