सिंधुदुर्ग : गणेशोत्सवानिमित्त गावी निघालेल्या गणेशभक्तांच्या बसला सिंधुदुर्गात अपघात झाल्याची घटना समोर येत आहे. दोन बसच्या धडकेत 20 प्रवाशी जखमी झाले आहेत. शनिवारी सकाळच्या सुमारास तळेरे ते विजयदुर्ग मार्गावर ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजयदुर्ग-पणजी आणि इचलकरंजी-विजयदुर्ग दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की दोन्ही बसच्या समोरील भागाचं मोठं नुकसान झाले आहे. दोन्ही बसचे चालक-वाहक देखील जखमी झाले आहेत. बस चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे समजते. एका गणेशभक्ताची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.
अपघातातील 10 जखमींना कासार्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर यातील 9 जण गंभीर असल्याने त्या जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.