गुहागर – गणपती सणासाठी आपल्या मुळ गावी येण्यासाठी निघालेला तरुणाचा गावी न येता मुंबईपासून जवळ असलेल्या तळोजा नदीमध्ये मृतदेह आढळून आल्याने या परिसरात एकच खळबळ माजली आहे. सध्या रायगड पोलीस यांचा तपास करत आहे.
गुहागर तालुक्यातील खोडदे येथील हा तरुण दिनांक 6 रोजी रात्री पहाटे 12 वाजता दादर रेल्वे स्टेशन वरून सुटणाऱ्या तुतारी एक्स्प्रेसने गावी येण्यासाठी निघाला होता. मात्र तो तरुण आपल्या गावी न पोचता त्याचा मृतदेह दिनांक रविवारी तळोजा नदीमध्ये आढळून आला. त्याच्या या मृत्यूने गुहागर तालुक्यातील खोडदे गावावरती शोककळा पसरली आहे. हा तरुण जर तुतारी एक्सप्रेसने गावी येण्यासाठी निघाला असताना तो गावी न पोचता त्याचा मृतदेह तळोजा खाडीमध्ये कसा सापडला.? याची चौकशी पोलीस करीत आहेत. अक्षय संतोष साळवी हा खोडदे तालुका गुहागर येथील रहिवाशी असुन सध्या राहणार मुंबई भांडुप येथे राहत होता. त्याचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे आहे. त्याच्या मृत्यूची. माहिती मिळताच खोडदे गावातून त्याचे नातेवाईक पनवेल येथे दाखल झाले आहेत या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.