खेड:- खेड शहरात ऐन गणेशोत्सवाता बंद घर फोडून कपाटातील 2 लाख 18 हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना गणपती आगमनाच्या दिवशी घडली. अज्ञात चोरट्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दादा महादेव देवरूखकर हे घराया मुख्य दरवाजाला कुलूप लावून पत्नी व मुलांसह बाहेर गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने धारदार हत्याराने कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटात लॉकरमध्ये स्टीलच्या डब्यात ठेवलेले 2 तोळे 850 ग्रॅम वजनाचे व 2 लाख 18 हजार रूपये किमतीच्या
सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्याने डल्ला मारला. देवरूखकर कुटुंबीय घरी परतल्यानंतर दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याचे दागिने लांबवल्याचे निदर्शनास येताच त्यांना धक्का बसला. त्यांनी पोलीस स्थानकात
धाव घेत घरफोडीची तक्रार नोंदवली. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या धामधुमीत चोरट्याचा शोध घेण्याचे
पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.