गुहागर : तालुक्यातील आंबेरे भुवड वाडी येथे 45 वर्षीय तरूणाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना 11 सप्टेंबर रोजी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली. सदाशिव गणपत वाघे (45, आंबेरे भुवड वाडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदाशिव वाघे यांच्या पोटात सकाळी अचानक दुखू लागले. याकडे दुर्लक्ष करत भाताची पेज पिऊन ते झोपून गेले. संध्याकाळी पुन्हा पोटात दुखू लागले. ॲसिडिटीचा त्रास वाटल्याने ते ईनो पिऊन घरीच होते. रात्री 10.30 च्या दरम्याने त्यांच्या पोटात जास्त दुखू 5. रात्रीच त्यांना अबलोली दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी गुहागर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याबाबत गुहागर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.