चिपळूण:-मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाला शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे.
बोलताना शरद पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांची मागणी योग्यच आहे. एकप्रकारे शरद पवार यांनी मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा असल्याचे सांगितले.
शरद पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दिला. जरांगे यांची मागणी योग्य असल्याने आरक्षणाला पाठिंबा आहे. त्याशिवाय इतर समाजाचाही विचार व्हावे, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले.
शरद पवार काय म्हणाले ?
एक देश एक निवडणूकबाबत कायदेशीर लढाई आणि मार्ग काढणे गरजेचं आहे.
घरात तरी काका आणि पुतणे एकत्र आहेत.
पहिल्यांदा आम्ही तिघांनाचा निर्णय घेऊ आणि त्यानंतर मग छोट्या पक्षांना बरोबर घेऊन त्यांना किती जागा द्यायचा याबत निर्णय घेऊ.
मुंबई गोवा महामार्गसारखा इतका वाईट रस्ता महाराष्ट्रात आहे.
महामार्गाच्या कामात किती बेफिक्रेने पाहिलं जातंय हे दुर्दैव आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सातवा दिवस
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे, त्यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. आज संभाजीराजे छत्रपती हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला येणार आहेत, दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान छत्रपती संभाजी राजे आंतरवालीत पोहोचतील आणि त्यानंतर जरांगे पाटील यांच्याशी चर्चा देखील करणार आहेत. दरम्यान आज कॅबिनेटची बैठक असून, या कॅबिनेटमध्ये मराठा आरक्षणावर काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाच असणार आहे.