चिपळूण :बहादूरशेख उर्दू शाळेत नवीन नवीन उपक्रम घेऊन शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याच्या हेतूने मुख्याध्यापक जियाऊल्ला खान सर्वतोपरी मेहनत घेत आहेत.शाळेतील विद्यार्थ्यांना आणि बालवाडीच्या विद्यार्थ्यां मध्ये लहान वया पासूनच स्पर्धेत टिकण्यासाठी नआत आणि प्रश्नमंजुषा या स्पर्धेचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमासाठी माजी विस्तार अधिकारी नसरीन खडस मॅडम,गोवळकोट केंद्रीय प्रमुख अशफाक पाते सर,अब्दुल रऊफ वांगडे, अहमद कुंडलिक, हसन वांगडे, अस्लम वांगडे, मुख्तार वांगडे, वलीद वांगडे, रजिया वांगडे, आबिदा वांगडे, शराफत फकीर, समीना खान, सायरून्निसा पाते, कौसर मुल्ला, फातिमा पाते, शाळेच्या माजी शिक्षिका नूरजहाँ खलफे ( नुरी मॅडम ), तालुक्यातील ज्येष्ठ शिक्षक एजाज इब्जी तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि शिक्षण प्रेमी यांच्या उपस्थितीत पार पडला.
विद्यार्थ्यांनी नआत ख्वानी आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेत चांगला सहभाग नोंदवून उत्तम कामगिरी केली. स्पर्धेचे नियोजन ही दर्जेदार होते.नआत ख्वानी मधील विजेते १) उम्मे कुलसूम खान २) मदीहा पाते ३) ज्युवेरिया मुजावर तसेच प्रश्नमंजुषा चे विजेते १) रिहाब शेख २) आमिना मुजावर ३) आसिया शेख. या सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थी तसेच ग्रामस्थांसाठी शाळेत ग्रंथालयाचे उद्घाटन नसरीन खडस मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथालयासाठी लोखंडी कपाट आणि गोष्टींची पुस्तके सुमारे दहा हजार रुपये किंमती चे साहित्य खडस मॅडम यांच्या तर्फे देण्यात आली. माजी शिक्षक प्रदीप पवार सर यांनी ही सुमारे साढे पांच हजार रुपयांची पुस्तके ग्रंथालयास देणगी स्वरुपात दिली. इब्राहिम वांगडे यांनी चार हजार रुपयांची पुस्तके भेट दिली. नूरजहाँ खलफे मॅडम यांनी शैक्षणिक साहित्या साठी साढे सात हजार रुपये देणगी स्वरुपात दिले. फातिमा कुपे आणि तारिक सय्यद यांनी शाळेसाठी प्रत्येकी एक एक हजार रुपये देणगी स्वरुपात दिले.
शेवटी सर्व उपस्थितांचे आणि शाळेच्या विकासासाठी देणगी देणाऱ्या सर्व व्यक्तींचे शाल आणि पुष्प देऊन मुख्याध्यापक जियाऊल्ला खान यांनी मन:पूर्वक आभार मानले.