चिपळूण:-मंडणगड,दापोली,खेड, चिपळूण,गुहागर पाच तालुक्यासाठी बांधकाम विभाग,कार्यकारी उपअभियंता कार्यालय रत्नागिरी येथे असल्यामुळे लोकांना नाहक त्रास होत आहे.तीन लाखाच्या पुढच्या बांधकामाचे बिल असेल तर,पाच तालुक्यातील ग्रामपंचायती व छोटे-मोठे ठेके दार यांना रत्नागिरीमध्ये हेलपाटे मारावे लागत आहेत.
कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग पंचायत कार्यालय रत्नागिरी वरुन स्थलांतरित करण्यात येणार आहे अशी माहिती मांजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी दिली.पाच तालुक्यासाठी असलेले कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या कार्यालयामध्ये सुरु आहे.
ते गैरसोईचे आहे अशी माहिती उपमुख्य मंत्री अजितदादा पवार यांच्या आपण निदर्शनास आणून दिल्यावर ग्रामीण चिपळूण समितीमध्ये अभियंता कार्यालयासाठी जागा उपलब्ध नव्हती म्हणून ते रत्नागिरी येथे चालू ठेवण्यात आले होते.सन २००७ साली आपण सभापती असताना पंचायत समितीच्या सेस फंडातून श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह बांधले.
तसेच अभियंता कार्यालय चिपळूणमध्ये येण्यासाठी कळंबस्ते पशुसंवर्धन कार्यालयाच्या आवारामध्ये जिल्हा परिषदेच्या प्रयत्नाने चिपळूण येथे स्थलांतरीत करण्यात येणार असल्याने गैरसोय दूर होणार आहे.काही इमारती धूळ खात पडल्या आहेत,त्याठिकाणी एका इमारतीमध्ये कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग पंचायत कार्यालय रत्नागिरी वरुन स्थलांतरित करण्यात येणार आहे अशी माहिती मांजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी दिली.
तरी तातडीने सदरचे कार्यालय रत्नागिरी येथून चिपळूण येथे हलविण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये सदरचे कार्यालय चिपळूण येथे सुरु होणार आहे.तसेच ब्रिटिश काळापासून रत्नागिरी येथे असलेले अकरा एकर जागेमध्ये असलेले मनोरुग्णालय हे रत्नागिरी येथून कोल्हापूर,निपाणी येथे नेण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या,त्यालाहि स्थगिती देण्यात यावी अशीही मागणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली असल्याची माहिती शौकतभाई मुकादम यांनी दिली.