लांजा : साटवली मार्गावर गोळवशी आमट्याचा वहाळ येथे बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघात प्रकरणी दुचाकीस्वाराला वर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना २५ सप्टेंबर रोजी घडली होती.
तालुक्यातील साटवली येथील वसीम अजीज गवंडे (वय ३५, राह.साटवली मुस्लिमवाडी) हा आपल्या ताब्यातील ग्लॅमर मोटरसायकल क्रमांक (एमएच.०८.एए.०४६८) घेऊन साटवलीहून लांजाकडे येत असताना लांजाहून साटवलीकडे जाणाऱ्या एसटी बसला धडकला होता. या अपघातात मोटरसायकलस्वार वसीम गवंडे हा गंभीर जखमी झाला होता.
रस्त्याची विशिष्ट परिस्थिती लक्षात न घेता मोटरसायकल हयगयीने, अविचारणे व वेगाने चालवून उजव्या बाजूला रॉंग साईडला जाऊन एसटी बसला धडक देऊन अपघात करून स्वतःच्या दुखापतीस कारणीभूत झाला म्हणून त्याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५ (अस) मोटारवाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल टी.एस.मोरे हे करत आहेत.