खेड:-मुंबई-गोवा महामार्गावरील आवाशीनजीक रविवारी दुपारच्या सुमारास एसटी बस आणि कार यांच्यात अपघात झाला. खड्डे चुकवताना हा अपघात घडला. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. मात्र कोणालाही दुखापती झाल्या नाहीत. अपघातानंतर काही काळ वाहतूक खोळंबली होती.