रत्नागिरी: साताऱ्यातील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात 16 व 17 ऑक्टोबर 2024 रोजी संपन्न झालेल्या 14 , 17 व 19 वर्षाखालील शालेय विभाग स्तरीय जलतरण स्पर्धेत 50 व 200 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये सुवर्णपदक आणि 100 मी. ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये रौप्य पदक विजेत्या निधी भिडे ची बालेवाडी, पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेमध्ये फाटक हायस्कूल रत्नागिरीचे एकूण चार विद्यार्थी सहभागी झाले होते. 14 वर्षे खालील मुलींच्या गटातील जलतरण स्पर्धेत निधी शरद भिडे इ. सातवी हिने 50 मी.ब्रेस्ट स्ट्रोक प्रथम क्रमांक, 100 मी. ब्रेस्ट स्ट्रोक द्वितीय क्रमांक, व 200 मी. ब्रेस्ट स्ट्रोक प्रथम क्रमांक पटकावला. तिची पुणे, बालेवाडी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तसेच 19 वर्षाखालील मुलांच्या गटांमध्ये यश कीर इ.बारावी याने 200 मीटर फ्रीस्टाईल मध्ये कांस्य पदक पटकावले.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या निधीचाआणि यश किर यांच दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे कौन्सिलर शेखर शेट्ये यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी फाटक हायस्कूलचे मुख्याध्यापक . राजन किर, उपमुख्याध्यापक . विश्वेश जोशी, संस्थेचे सचिव दिलीप भातडे, क्रीडा प्रमुख मंदार सावंत व क्रीडा शिक्षिका बेबीताई पाटील उपस्थित होते. विजेत्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.