मंडणगड:-विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या कडक अंमलबजावणीसाठी मंडणगडातील महसूल, पोलीससह अन्य प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. पोलीस स्थानकातील भरारी पथकांकडून वाहनांची तपासणी करण्यात येत असून संशयास्पद हालचालींवर पोलिसांचे बारीक लक्ष आहे.
पोलीस स्थानक हद्दीत येणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी सुरु असून या संदर्भातील संशयास्पद हालचालीवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. निवडणुकांच्या कालावधीत विनापरवाना व बेकायदेशीर मद्यविक्री साठवणूक व वाहतुकीविरोधात पोलीस सक्रिय झाले आहेत. रविवारी तिडे येथील अक्षय म्हाप्रळकर (31) याच्याविरुद्ध देशी दारु विनापरवाना ताब्यात बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.