संगमेश्वर:-तालुक्यातील विघ्रवली राववाडीत बिबटयाचा मुक्त संचार सुरू आहे. गुरूवारी सायंकाळी 6 ते 9 वाजण्याच्या कालावधीत दोन वेळा बिबटया दृष्टीस पडल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
विविध गावात सध्या बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. भर दिवसा दडी मारून बसलेला बिबट्या जनावरांवर हल्ला करत असल्यो चित्र आहे. तर दुसरीकडे बिबटयाच्या मृत्यू संख्येतही वाढ होत आहे. देवरुख नजीकच्या
विघ्रवली राववाडी येथे तुकाराम बोटके यांच्या घराजवळ सायंकाळी 6 व रात्री 9 वाजता असे दोन वेळा बिबटयाने गावात एन्ट्री केली. बोटके कुटुंबियांनी या बिबटयाला कॅमेराबध्द केले आहे. आरडा ओरडा केल्यानंतर या बिबटयाने जंगलात धुम ठोकली.
बिबटयाच्या मुक्त संचारामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. मनुष्यावर प्राणघातक हल्ला करण्यापूर्वी वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.