चिपळूण:- गाव विकास समितीकडून सौ अनघा राजेश कांगणे यांनी शुक्रवारी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे, शांताराम कांगणे गुरुजी, महिला संघटना अध्यक्षा दीक्षा खंडागळे,गाव विकास समितीचे सरचिटणीस डॉक्टर मंगेश कांगणे, महेंद्र घुग सर, राजेश कांगणे आधी उपस्थित होते. गाव विकास समिती संघटनेच्या निवडक सहकाऱ्यांच्या उपस्थितीत अर्ज करण्यात आला.