2019 च्या तुलनेत उदय सामंतांची पाच वर्षात फक्त 47 लाखांनी संपत्ती वाढली
रत्नागिरी:-रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मातदार संघाचे महायुतीचे उमेदवार उदय सामंत आणि राजापूर लांजा विधानसभा मतदार संघाचे उमेदवार किरण सामंत यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी नामनिर्देश पत्र सादर करताना सामंत बंधूंनी आपल्या स्थावर व जंगम मालमत्तेची माहिती सादर केली आहे. यामध्ये पालकमंत्री उदय सामंत यांच्या पेक्षा त्यांचे बंधू किरण सामंत यांच्याकडे जास्त संपत्ती दिसून येत आहे. उदय सामंत यांची एकूण स्थावर व जंगम मालमत्ता 4 कोटी 52 लाख 22 हजार 210 रुपये आहे. तर त्यांचे बंधू किरण सामंत यांची संपत्ती 13 कोटी 1 लाख 6 हजार रुपये आहे. म्हणजेच किरण सामंत यांच्याकडे 8 कोटी 48 लाख 83 हजार 826 रुपये एवढी जास्त संपत्ती उदय सामंत यांच्यापेक्षा आहे.
2019 च्या नामनिर्देशन पत्रात उदय सामंत यांनी स्थावर व जंगम मालमत्ता 4 कोटी 5 लाख 21 हजार 159 एवढी नमूद केली होती. 2019 च्या तुलनेत उदय सामंत यांची मालमत्ता 5 वर्षांनी फक्त 47 लाख 1 हजार 50 रुपये 16 पैशांनी वाढली आहे.
उदय सामंत यांची संपत्ती:-
स्थावर संपत्ती- (घर, जमीन)
3 कोटी 30 लाख 10 हजार
जंगम मालमत्ता- (पैसे, गाड्या, दागिने)
1 कोटी 22 लाख 12 हजार 220 रुपये
पत्नी- जयश्री सामंत – 47 लाख 85 हजार
मुलगी – तिर्था सामंत – 7 लाख 32 हजार 353
मुलगी- कीर्ती सामंत – 40 हजार 789 रुपये
एकूण – 4 कोटी 52 लाख 22 हजार 210 रुपये.
किरण सामंत यांची संपत्ती:-
4जंगम मालमत्ता- (पैसे, गाडी, दागिने)- 13 कोटी 1 लाख 6 हजार 36
स्थावर मालमत्ता- (घर, जमीन) – 4 कोटी 12 लाख 68 हजार
पत्नी- वर्षा सामंत (पैसे, गाडी, दागिने) – 11 कोटी 44 लाख 822 रुपये
स्थावर मालमत्ता- (घर, जमीन) – 1 कोटी 61 लाख 93 हजार 618 रुपये
मुलगी- पूर्वा सामंत – 88 लाख 80 हजार 424
मुलगा– विश्वजित सामंत – 43 लाख 53 हजार 228
उदय सामंत यांची 2019 ची संपत्ती
स्थावर मालमत्ता :- 3 कोटी 11 लाख 48 हजार 423 रुपये
जंगम मालमत्ता :- 93 लाख 72 हजार 736 रुपये 84 पैसे
एकूण कर्ज :- 1 कोटी 26 लाख 70 हजार 348 रुपये 43 पैसे