कुडाळ:-गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी आंबोली पोलीसांनी कुडाळ येथील दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चार रेडे व दोन म्हैशी आणि वाहतुकीसाठी वापरलेला टेम्पो, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई सावंतवाडी-बेळगाव रोडवर येथे करण्यात आली. मंदार मंगेश कर्पे (वय २६, रा घावनळे) व अश्पाक मोहम्मदगौस जकाती (वय २६,रा. कुडाळ बाजारपेठ) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर प्राण्यांचा छळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सावंतवाडी-बेळगाव रोडवर टेम्पोमधून बेकायदा गुरांची वाहतूक करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यावेळी गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये चार रेडे व दोन म्हैशी आढळून आल्या. त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर प्राण्यांचा छळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण व सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई, दीपक शिंदे, मनीष शिंदे, अभिजीत कांबळे आदींच्या पथकाकडून करण्यात आली.