देवरुख:-शाळांना सुरू होणाऱ्या सुटीचा कालावधी लक्षात घेता देवरूखहून गोंदवल्याला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी म्हसवडपर्यंतची बस देवरूख एसटी आगारामार्फत खास दिवाळीसाठी सुरू करण्यात आली आहे.
देवरूखहून सकाळी ६ वाजात सुटणारी ही बस म्हसवडला दुपारी साडेबारा वाजता म्हसवडला पोहोचेल, तर परतीच्या प्रवासात ही बस म्हसवडहून दुपारी २ वाजता सुटून देवरूखला रात्री साडेआठ वाजता परत येईल. ही बस साखरपा, मलकापूर, कोकरूड, कराड, पुसेसावळी, वडूज, दहिवडी आणि गोंदवले या मार्गे धावणार आहे.
देवरूखहून सुटलेली बस मलकापूरला ८ वा., कराडला १० वा., गोंदवलेला १२ वा. आणि म्हसवडला १२.३० वा. पोहोचेल. म्हसवडहून सुटलेल्या बसचा प्रवास गोंदवलेला २.३० वा., कराडला ४.३० वा., मलकापूरला ६.३० वा. होईल. रात्री ८.३० वा. ही बस देवरूखला येणार आहे.
या बससेवेमुळे श्री देवी सोळजाई, श्री देव मार्लेश्वर, श्री देवी यमाई, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आणि श्री देव सिद्धनाथ यांचे दर्शन घेणाऱ्या भाविकांसह, माहेरवाशीण, विद्यार्थी, नोकरदार आणि व्यापारीवर्गाला प्रवासाची मोठी सोय होणार आहे. सर्वांनी या बससेवेचा लाभ घेऊन आनंददायी आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन देवरूख आगाराने केले आहे.