रायगड:-रायगड जिल्ह्यातील चौक येथे एक व्यक्ती पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती स्थानिक अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाला मिळाली होती पोलिसांनी रविवारी पाच वाजण्याच्या सुमारास एका तरुणाला विक्री करीत असताना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव सौरभ जगदीश प्रसाद आर्या (२३) रा. मोहपाडा ता. खालापूर हा मुंबई पुणे महामार्गावरील हॉटेल तेजस येते येणार असल्याचे समजल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी दबा धरून बसले असताना त्यांना मिळालेल्या माहितीनुसार एक विषय संशयास्पद फिरत असताना आढळून आले पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याचे नाव सौरभ आर्या असल्याचे समजले त्याची अंग जडती घेतल्यानंतर त्याच्याजवळ एक पिस्तूल आणि दोन जिवंत काढतो असे सापडली सदरचे पिस्तूल आणि काढतोच विक्री करता आणण्याचे आरोपी सौरभ यांनी कबूल केले याप्रकरणी खालापूर पोलीस ठाणे येथे शस्त्र अधिनियम १९५९ विनापरवाना अग्निशस्त्र कलम ३/२५ प्रमाणे महाराष्ट्र पोलीस कायदा ३७(१),(र) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार रवींद्र मुंडे पुढील तपास करीत आहेत.