राजापूर/तुषार पाचलकर:-गेली अनेक वर्ष भारतीय जनता पक्षात कार्यरत असलेल्या व राजापूर -लांजा -साखरपा भाजपाच्या विधानसभा क्षेत्र समन्वयक असलेल्या उल्का विश्वासराव यांनी मंगळवारी आमदार भास्कर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना (उभाठा )पक्षात प्रवेश केला. राजापूर शहरातील मातोश्री हॉलवर झालेल्या कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार राजन साळवी, शिवसेना नेते अजित यशवंतराव, तालुका प्रमुख कमलाकर कदम यांच्यासह मविआचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
राजापूर विधानसभा मतदार संघातील भाजपच्या त्या प्रमुख पदाधिकारी होत्या.
सत्तेच्या माध्यमातून त्यांनी अनेक विकास कामे मार्गी लावली असून राजापूर विधानसभा मतदारसंघाच्या समन्व्यक म्हणून त्यांनी यशस्वी काम केले होते.पक्ष वाढीसाठी त्यांचे मोलाचे योगदान होते. दोन दिवसापूर्वी त्यांनी भाजपमधील सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मंगळवारी राजापुरातील मातोश्री सभागृहात पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन मेळाव्यात उध्दवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मंत्री, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री भास्करराव जाधव यांच्या उपस्थितीत उध्दवसेना पक्षात प्रवेश केला. त्यावेळी महाविकास आघाडीचे अधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.