उदय सामंत यांच्या वक्तव्याने सारेच स्पष्ट
रत्नागिरी:-जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उद्धव ठाकरे सेनेचे जेष्ठ नेते उदय बने हे निष्ठावान म्हणून ओळखले जातात. पक्षसंघटनेत राहत असताना निष्ठा काय असते हे त्यांनी दाखवून दिले. पण त्यांच्या वाटेला काय आले असेल तर त्यांच्याच सहकाऱ्यानी त्यांना बदनाम केले असल्याचे सामंत म्हणाले. पण भविष्यात दोन उदय एकत्र आले तर विकासात्मक नव्हेच तर सगळ्याच गोष्टीत संघटनात्मक काम आम्ही करु असेही सामंत यांनी सांगितले. त्यांच्या सोबतच्या अनेक सहकाऱ्यानी शिवसेनेत प्रवेश केलेला आह़े हा एक ट्रेलर आहे लवकरच अजुनही अनेकजण येण्याच्या मार्गावर असल्याचे सांगितले. त्यांच्या या वक्तव्याने पुढे काय होणार हे सांगायला एखादा ज्योतिषाची गरज नाही.