संगमेश्वर:-चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक रिंगणार उतरणार होतो. त्यांनी तसे जाहीरही केले होते. मात्र अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशीही मनसेने अर्ज न भरल्याने या निवडणुकीतून माघार घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. आता मनसे या मतदारसंघात कोणाला पाठिंबा देणार, याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
महायुतीच्यावतीने शेखर निकम, आघाडीच्यावतीने प्रशांत यादव हे चिपळूण संगमेश्वर विधानसभा निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीत मनसेने उडी घेतली होती. तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्रीपत शिंदे हे 29 रोजी उमेदवारी अर्ज सादर करणार असल्याचे मनसे वर्तुळातून बोलले जात होते. मात्र अंतिम दिनीही शिंदे यांनी अर्ज सादर न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या बाबत श्रीपत शिंदे प्रकृतीत अस्वास्थ्यामुळे आपण माघार घेतल्याचे सांगितले.