गाव विकास समिती कडून दोन अर्ज दाखल,अर्ज वैध्य झाल्यानंतर एक अर्ज मागे घेतला जाणार
देवरुख:-कॅशलेस हॉस्पिटल, तालुका निहाय एमआयडीसी विकास, ग्रामीण शाळांचा शैक्षणिक दर्जा, शेती विकास आणि पायाभूत सुविधा या चार गॅरंटी गाव विकास समितीकडून चिपळूण संगमेश्वर मधील नागरिकांना या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही देत असून उमेदवार विजयी झाल्यास पहिल्या दोन वर्षात हॉस्पिटल आणि एमआयडीसी विकास, शेती विकासाला चालना, शाळांचा शैक्षणिक दर्जा या या कामांना सुरुवात झालेली दिसेल असा विश्वास गाव विकास समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत महिला संघटना अध्यक्ष खंडागळे- गीते, सरचिटणीस डॉक्टर मंगेश कांगणे, उपाध्यक्ष राहुल यादव यांनी व्यक्त केला.
गाव विकास समितीने चिपळूण- संगमेश्वर विधानसभेत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर देवरुख येथे पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. गाव विकास समिती मार्फत सौ.अनघा कांगणे या महिला उमेदवार रिंगणात उतरवण्यात आल्या आहेत. तर एडवोकेट सुनील खंडागळे यांनी डमी अर्ज दाखल केला आहे.उमेदवारी अर्ज वैध ठरल्यानंतर एडवोकेट सुनील खंडागळे हे अर्ज मागे घेणार आहेत.गाव विकास समिती यावेळी कोकणातील निवडणूक मुद्द्यांच्या आधारे व्हावी यासाठी आग्रही असून धनसंपत्ती विरुद्ध लोकशक्ती अशी ही निवडणूक असल्याचे गाव विकास समितीचे उपाध्यक्ष राहुल यादव यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्यात आरोग्याचा प्रश्न गंभीर असून अनेक नागरिकांना आरोग्याच्या सेवा वेळेत मिळत नाहीत.परिणामी अनेकांना जीव गमावा लागतो.
तालुक्याच्या ठिकाणीच सुसज्ज रुग्णालय असावं त्या दृष्टीने कॅशलेस हॉस्पिटल चिपळूण संगमेश्वर मध्ये उभारण्याची गॅरंटी आम्ही नागरिकांना देत आहोत असेही उपाध्यक्ष राहुल यादव यावेळी म्हणाले. त्याचबरोबर चिपळूण- संगमेश्वर मध्ये बंद पडत चाललेली शेती ही विकसित करण्याच्या दृष्टीने शेती विकासाचे धोरण आपण राबवू असेही कृषी तज्ञ राहुल यादव यांनी सांगितले.ग्रामीण शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेतले जातील असे यावेळी महिला अध्यक्ष दीक्षा खंडागळे गीते यांनी सांगितले. तर तरुणांच्या रोजगारासाठी व वाढते स्थलांतर थांबवण्यासाठी तालुका निहाय एमआयडीसी विकास हा चिपळूण संगमेश्वर मध्ये केला जाईल ही गॅरंटी गाव विकास समितीमार्फत देण्यात येत असल्याचे डॉक्टर मंगेश कांगणे यांनी यावेळी बोलताना सांगितले.यावेळी गाव विकास समितीच्या उमेदवार सौ. अनघा राजेश कांगणे याही उपस्थित होत्या. त्याचबरोबर दिक्षा खंडागळे,राहुल यादव,पूजा घुग उपस्थीत होते.