खेड:-तालुक्यातील पोयनार-कोंडीवाडी येथे 50 हजार रूपये किंमतीची सिंगल बॅरल असलेली ठासणीची बंदूक खेड पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणी विजय हनुमंत धुमक (59,रा. पोयनार-कोंडीवाडी) याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडे विनापरवाना ठासणाच्या बंदुकीसह लहान-मोठे छरे व गन पावडर आढळली. या बाबत पोलीस शिपाई राहुल कोरे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.