देवरूख : कलाकार कलेतून कला साकारत असतात; मग ते चित्रं असो वा शिल्प. ते जिवंत वाटणे ही त्या कलाकाराची खरी कसोटी असते. देवरुखचे रांगोळी कलाकार विलास रहाटे यांनी अशीच एक रांगोळी दिवाळी निमित्य साकारली आहॆ. त्यांनी रांगोळीतून चक्क फराळाचे ताट साकारले आहॆ. त्या ताटात त्यांनी दिवाळीला करण्यात येणाऱ्या सगळ्या फराळाचे पदार्थ रांगोळीतून साकारले आहेत.
रांगोळीतून रहाटे यांनी लाडू, चकल्या, करंज्या, शेव, वाटी चमचा हे पदार्थ आणि वस्तू साकारल्या आहेत. ही रांगोळी इतकी संजीव वाटते की ती रांगोळी आहॆ की खऱ्या फराळाचे छायाचित्र हे सांगणे अवघड आहॆ. सध्या रहाटे यांची ही रांगोळी कलाविश्वात प्रचंड गाजत आहॆ.
कलाकार विलास रहाटेने रांगोळीतून साकारला फराळ
