रत्नागिरी:- तालुक्यातील मालगुंड ते निवेंडी फाटा येथील फेफडेवाडी येथील जंगलमय भागात बेकायदेशिरपणे गावठी हातभट्टीची 920 रुपयांची 9 लिटर दारु विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगणार्या विरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वा. करण्यात आली.
शंकर भिवा गिड्ये (रा. निवेंडी,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस काँस्टेबल कुणाल चव्हाण यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित हा बेकायदेशिरपणे गावठी हातभट्टीची 9 लिटर दारु विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगून असताना बुधवारी ही कारवाई करण्यात आली.