ठाकरे गटाकडून स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती
चिपळूण:-शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभेसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यांनतर आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
त्यात कोकणातील विनायक राऊत आणि भास्कर जाधव यांची निवड करण्यात आली आहे. मात्र हे दोन्ही नेते राज्यात कोणत्या भागातील उमेदवारांचा प्रचार करतील याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
लोकसभेतील जबाबदारीनुसार राऊत यांच्याकडे कोकण तर भास्कर जाधव यांच्याकडे विदर्भाची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. तसेच झाल्यास भास्कर जाधव यांना पुन्हा काँग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करावा लागणार आहे. माजी खासदार विनायक राऊत निवडणुकीच्या रिंगणात नाही. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी ते पूर्णपणे मोकळे आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जाण्याची शक्यता आहे. भास्कर जाधव यांच्याकडे पक्षाने पूर्व विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघ संभाळून त्यांना पक्ष देईल त्या भागात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करावा लागणार आहे.