रत्नागिरी:-शहरातील झाडगांव येथे भैरीची सहाण येथे आली लहर केला कहर या ग्रुपतर्फेकडून प्रतिवर्षाप्रमाणे नरक चतुर्दशीनिमित्त नरकासुररूपी राक्षसाचा १५ फुटी पुतळा दहन केला.
समाजातील वाईट प्रवृतीचा नाश होण्यासाठी हा पुतळा उभारून फटाक्यांच्या आतषबाजीत आणि ढोल- ताशांच्या गजरात दहन करून जल्लोष करण्यात आला.
यावेळी अनिकेत जांभळे, ओंकार बसणकर, सुयोग मोरे, सुमित गोवेकर, प्रवीण सरवणकर, सिद्धेश देसाई, सागर देसाई, निखिल घाग, संदेश मोरे, संदीप सुर्वे, सिया मोरे, ओंकार वैद्य, सुनील मोरे, प्रमोद नरवणकर, सचिन साळवी, निनाद नरवणकर, वरद सावंत, शरद मोरे, सुभाष गोवेकर, सागर नांदगावकर, अखिल गावडे, नाना बाणे, भैया गावडे, महेश बाणे, विराज पवार आदी उपस्थित होते. तसेच आली लहर केला कहर ग्रुप आणि भैरी जोगेश्वरी ढोलपथक यांचे सहकार्य लाभले.