खेड : तालुक्यातील आवाशी-माळवाडी येथे 53 वर्षीय प्रौढाचा राहत्या खोलीत आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना 29 ते 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 च्या सुमारास घडली. प्रदीप रखाळ दास (53 मूळ गाव बंगाल, सध्या रा. आवाशी-माळवाडी) असे मृत प्रौढाचे नाव आहे.
तो भाड्याने राहत होता. रूम मालक गुरांच्या गोठ्यात साफसफाई करत असताना निदर्शनास न आल्याने दरवाजातून डोकावून पाहिले असता तो दरवाजात झोपलेल्या स्थितीत आढळला. हाक मारल्यानंतर कोणताही प्रतिसाद न दिल्याने त्याला हलवण्याचा प्रयत्न केला असता त्याने काहीच हालचाल केली नाही. या बाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.