रत्नागिरी:- तालुक्यातील उक्षी-वांद्री पुलावर वाहनचालकांना दिसतेय भुताटकी? अशी भुताटकी नसून भास होत असतील असे काही नागरीक बोलत आहेत. पुलाच्या बाजूलाच एक स्मशानभूमी असल्याने त्याचा आधार देण्याचा काहींनी पराक्रम केला आहे. मात्र त्या स्मशानभूमीतून आजपर्यत असे काहीच घडले नसल्याचे इथल्या ग्रामस्थांकडून बोलले जात आहे. मात्र या प्रकाराने काही नागरीक पुरते घाबरून गेले आहेत. अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन करूनही लोकांच्या मनात भीती आहे. काहीजण हे असेलच अस नाही पण खात्री करून घ्यायला हवी असे ही बोलत आहेत.
‘उक्षी-वांद्री पुलावर वाहनचालकांना दिसतेय भुताटकी?अफवांवर विश्वास ठेवू नका अंनिसचे आवाहन’ अशी बातमी काल ग्रामीण वार्ताने आपल्या डिजिटल मीडियावर प्रकाशित केली होती. आता मात्र या कथित भुताटकीची परिसरात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. या परिसरात आजतागायत अश्या कोणत्याही घटना घडल्या नाहीत. असे इथले ग्रामस्थ सांगतात. त्याचबरोबर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
मात्र परिसरात तसेच विविध भागातून लोकांनी ग्रामीण वार्ताशी संपर्क साधून ‘हे फोटो अनेक महिन्यांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अमक्या ठिकाणी भूत दिसले,तमक्या ठिकाणी मुंडक नसलेली बाई दिसली अश्या आशयाचे मेसेज सध्या व्हायरल होत आहेत. खरच असं काही आहे का?’ असे प्रश्न ही अनेकांनी ग्रामीण वार्ताला विचारले. मुळात तसे काही अस्तित्वातच नाही. या फक्त पसरवल्या गेलेल्या अफवा आहेत.
मात्र ग्रामीण वार्ता या प्रकरणाची पुष्टी करत नाही. आम्ही लोकांना जागरूक करण्याचे काम करत आहोत. लोकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे वारंवार सांगत आहोत. त्याचबरोबर व्हायरल झालेले फोटो सुद्धा सोशल मीडियावर इतरांना पाठवू नये असे ही वारंवार सांगण्यात येत आहे.
त्याचबरोबर अंनिसने ही तसे आवाहन केले आहे.