मडगाव : कोकण रेल्वे मार्गावर आजपासून उन्हाळी वेळापत्रक लागू झाले आहे. पावसाळ्यात कमी झालेला गाड्यांच्या वेगात आता वाढ होणार आहे. उन्हाळी वेळापत्रकानुसार स्थानकावर येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांच्या वेळांमध्ये एक ते दोन तासांचा बदल होणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावर रेल्वेचे वेळापत्रक पावसाळी व उन्हाळी अशा दोन टप्प्यात चालवले जाते. पहिल्या टप्प्यात १ नोव्हेंबर ते ९ जून हा उन्हाळी हंगामातील वेळापत्रक लागू केले जाते. तर पावसाळी हंगामासाठी गाड्यांचा वेग कमी केला जात व १० जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीमध्ये गाड्यांचा वेग निश्चित केला जातो. उन्हाळी वेळापत्रकानुसार गाड्यांचा वेग ताशी १३० ते १६० किलोमीटर राहील. यामुळे या मार्गावर वेगवान गतीने धावणारी वंदे भारत एक्सप्रेस अवघ्या ७ तास ४५ मिनिटामध्ये मुंबईहून मडगावला पोहोचणार आहे. तर तेजस एक्स्प्रेस ९ तास १० मिनिटांमध्ये मडगावला पोहोचणार आहे. जनशताब्दी एक्स्प्रेस ही ९ तास २० मिनिटांमध्ये मुंबईहून मडगावला पोहोचणार आहे. कोकण कन्या एक्स्प्रेस मडगाव येथून सायं. ७ वा. सुटून सावंतवाडीला ८.३८ वा., कुडाळ ९ वा., सिंधुदुर्गनगरी ९.१४, कणकवली ९.३० आणि वैभववाडीला ९.५६ वाजता सुटून मुंबई सीएसटीला पहाटे ५.४० वाजता पोहोचणार आहे. जनशताब्दी एक्स्प्रेस मडगाव येथून दुपारी ३.०५ वा. सुटून सावंतवाडीला दुपारी ४.२४, कुडाळ ४.४२, कणकवली ५.०४ वा. येणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेस मडगाव येथून दुपारी २.४० वा. सुटून कणकवली सायं. ४.२० वा. येणार आहे. मांडवी एक्स्प्रेस मडगाव येथून सकाळी ९.१५ वा. सुटून सावंतवाडील १०.४२, कुडाळ ११.०४, सिंधुदुर्ग नगरी ११.१७ कणकवली ११.३२ तर वैभववाडीला ११.५८ येणार आहे.
पर्यटकांची संख्या वाढेल
दिवाळीच्या सुट्टीत पर्यटक मोठ्या संख्येने गोव्याला येतात. यात देशी पर्यटकांची संख्या जास्त असते. कोकण रेल्वेचे बदललेल्या वेळापत्रकाची माहिती घेऊन प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.