रत्नागिरी : शहरातील हिंदू कॉलनी येथे एका घरकाम करणाऱ्या महिलेला चोरट्याने लुटल्याचा प्रकार आता भर दुपारी घडला आहे. या प्रकाराने शहर परिसरात खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, विश्वनगर येथील एक महिला हिंदू कॉलनी येथे घरकामासाठी गेली होती. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हिंदू कॉलनी येथून घरकाम आटोपून विश्र्वनगरच्या दिशेने जाताना एका दुचाकीवरून दोघेजण आले. त्यांनी ओ ताई 20 रुपये द्या ना असे सांगितले. त्या महिलेने पाकीट काढले असता त्याने तिला धमकी दिली. आणि हातातील पाकीट हिसकावून फरार झाला. या पाकिटात महिलेचे हजारो रुपये होते. जवळपास पाच सहा हजार रुपये असल्याचे समजते. दिवाळीनिमित्त झालेला पगार तिच्या पाकिटात होता. सारेच पैसे चोरट्याने चोरून नेल्याने ती भयभीत झाली. दिवाळीनिमित्त दुपारी बऱ्याच घराना ताळे असल्याने त्यांनी आरडाओरडा करूनही कोणी मदतीला धावले नाही. या नंतर घाबरलेल्या त्या महिलेने घरी जाऊन याबाबतची माहिती दिली. गरीब बिचाऱ्या घरकाम करणाऱ्या महिलेने महिनाभर कष्ट करून कमावलेले पैसे चोरट्याने असे पळवून नेल्याने त्या महिलेला दुःख झाले आहे.