संगमेश्वर : दिवा पैंसेजर रेल्वेने प्रवास करीत असताना चिपळूण ते संगमेश्वर रेल्वेस्टेशन दरम्यान प्रवाशाचा दीड लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना ११ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी २२ मार्च रोजी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्यादी मनिष लीलाधर खिरीट (३८ वर्ष, खारी ता रोहा जि रायगड) यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिष लीलाधर खिरीट हे आपल्या पत्नी व मुलांसह दिवा पॅसेंजरने प्रवास करत असताना चिपळण पर्यत फिर्यादी यांचे पत्नीकडे असलेली पर्स मौजे संगमेश्वर रेल्वेस्टेशन येथे सिटवर दिसून न आल्याने पत्नीला विचारणा केली. तिच्या पर्समध्ये असलेला Redmi8A कंपनीचा काळया रंगाचा मोबाईल, samsumg कंपनीचा राखाडी रंगाचा मोबाइल, २५००/- रू रोख रक्कम, २०० /- रू किंमतीची एक लेडीज चॉकलेटी रंगाची पर्स.
वरील वर्णनाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून घेवुन जावुन सदर चोरीस गेलेल्या मोबा. मध्ये अँप इन्टॉल करून त्याचा पासवर्ड रिसेट करून फिर्यादी यांचे पत्नीचे खाते ट्रान्सपर करून एकुण १,६५,७००/- रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.