तुषार पाचलकर/राजापूर:-रत्नागिरी जिल्ह्यातील अती महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या राजापूर तालुक्याच्या पोलीस निरक्षकपदी नुकतीच अमित यादव यांची नियुक्ती झाली असून राजापूर तालुक्यात दोन महिन्यापूर्वी जी शांतता होती तशीच शांतता यापुढे कायम राहिलं याकडे पूर्णपणे लक्ष केंद्रित करणार असल्याचे आश्वासन पदभार स्विरल्यानंतर त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.
या आधी राजाराम चव्हाण यांनी राजापूर तालुका पोलीस निरीक्षक पदाचा कारभार उत्तम रित्या संभाळला होता.त्यांची बदली झाल्यानंतर नाटे पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांनी काही दिवसासाठी राजापूर पोलीस स्टेशनं चे प्रभारी म्हणून काम सांभाळले आहे.
दिनांक 19 मार्च रोजी अमित यादव यांनी राजापूर पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारून राजापूर तालुक्यात शांतता आणि सुव्यवस्था कशी राहिल याकडे लक्ष केंद्रित केले आहे.
अमित यादव यांनी या आधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओरस पोलीस स्टेशनं, वैभववाडी पोलीस स्टेशन,कणकवली पोलीस स्टेशन या ठिकाणच्या संवेदनशील भागात काम पाहिलं आहे.
एक वर्षापूर्वी त्यांची रत्नागिरी जिल्ह्यात नियुक्ती झाली. संघमेश्वर, देवरुख या ठिकाणहून आता त्यांनी नुकताच राजापूरचा पदभार स्विकारला आहे.
जनतेला आवाहन करताना त्यांनी छोट्या छोट्या कारणामुळे समाजामध्ये मोठा वाद निर्माण होईल अशी स्थिती निर्माण करू नये,पूर्वापार आपल्या परंपरा आहेत त्या मान्य करून आपली लहान मुलं आया बहिणी आहेत त्यांच्या मनात भीतीच वातावरण तयार होईल अशी स्थिती निर्माण होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेताना सर्वांनी शांतता कशी राखता येइल याची जबाबदारी घेतली पाहिजे असं आवाहन राजापूरच्या जनतेला त्यांनी केले आहे.