चिपळूण – सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्यातील लोककला, लोकपरंपरा व लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे तसेच नवीन पिढीला आपल्या उच्च संस्कृतीची व परंपरेची ओळख नव माध्यमातून व्हावी या उद्देशाने माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या अभिनव कल्पनेतून व श्री विकास खारगे, माननीय मुख्यमंत्री यांचेअपर मुख्य सचिव तथा अप्पर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2025 चा कोकणातील पारंपरीक लोककलेचा नमन महोत्सव दिनांक 25 मार्च ते 27 मार्च 2025 या कालावधीत चिपळूण येथे आयोजित करण्यात येत आहे.
या महोत्सवात मंगळवार दिनांक 25 मार्च 2025 रोजी बालमित्र नमन मंडळ, कोंडये देवळाचीवाडी , संगमेश्वर, रत्नागिरी श्री काळभैरव नमन नाट्य मंडळ वाडदई (वरची वाडी) ता.गुहागर बुधवार दिनांक 26 मार्च 2025 रोजी श्री मठ बाबा नमन मंडळ रूण, ता.लांजा हौशी कलावंत नाट्य नमन, भू पंचक्रोशी ता. राजापूर श्री सह्याद्री मार्लेश्वर कला मंच, देवरू संगमेश्वर श्री हनुमान भक्त सेवा मंडळ, फणसवळे ता. रत्नागिरी गुरुवार दिनांक 27मार्च 2025 रोजी श्रीराम नाट्य नमन मंडळ.कामथे हुमणेवाडी, चिपळूण -रत्नागिरी नवयुग सेवा नमन मंडळ, आसगे मांडवकरवाडी, लांजा, रत्नागिरी श्री रासाई उत्कर्ष नमन मंडळ, कुवे , लांजा, रत्नागिरी शिवभक्त कोकण लोकनाट्य नमन *मंडळ, संगमेश्वर, रत्नागिरी या कलापथकांचे सादरीकरण होईल. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, मार्कंडी ,चिपळूण कराड रोड ता.चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथील नमन महोत्सव रसिक प्रेक्षकासाठी विनामूल्य आहे. या महोत्सवात सहभागी कलाकाराचा किंबहुना या कलापथकाचा,संगीत नृत्याचा मिलाफ असणाऱ्या कार्यक्रमाचा कला रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन श्री. विभीषण चवरे, संचालक सांस्कृतिक कार्य यांनी केले आहे.