चिपळूण : तालुक्यातील मानाच्या परंतू मागील पाच वर्षांपासून सतत वादात राहिलेल्या सावर्डे गावच्या श्री देव केदारनाथ ऊर्फ केदार बाजी वरदान देवीच्या यावर्षीच्या पालखी सोहळ्याची सांगता करण्याचा निर्णय काल साहाय्यक पोलिस अधिक्षक राजमाने साहेब यांच्या सोबत सावर्डे पोलिस ठाणे येथे झालेल्या बैठकित घेण्यात आला. गावातील खोत व देवाचे गुरव तसेच गावकर यांच्यात मागील पाच वर्षापासुन मानपानावरून वाद सुरू आहे. यावादातून गावात मूळगावकर व गुरव आणि खोत असे दोन गट पडले. पालखी सोहळ्याच्या या वादाबाबत मा. न्यायालयात खटला दाखल असून अंतिम सुनावणी प्रलंबीत आहे.
परंतू यावर्षी शिमगोत्सवात आपसी सामंजस्य राखत पालखी सोहळा पार पाडावा असे मा. न्यायालयाने सांगितले होते. त्यानुसार दि. २४ मार्च रोजी सावर्डे पोलिस ठाणे येथे साहाय्यक पोलिस अधिक्षक श्री राजमाने साहेब यांच्या सोबत झालेल्या बैठकित गाव व खोत यांच्यात आपसी समझोता न झाल्याने दि. २५ मार्च रोजी सायंकाळी ४ वा. गावचे शिंपणे करा व पालखी सोहळा संपवा असे आदेश साहाय्यक पोलिस अधिक्षक श्री राजमाने साहेब यांनी दिले. त्याच प्रमाणे कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही गंभीर प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पालखी सोहळ्या भोवती पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.
गावातील या वादामूळे होळी पासून मागिल दहा ते बारा दिवस सहाणेवर बैठी असलेली गावदेवांची पालखी आपल्या घरी न आल्याने सामन्य गावक-यांन मध्ये दुख: व निराशेच्या भावना व्यक्त होत आहेत. सावर्डे गावच्या मागिल 70 वर्ष्याच्या इतिहासात पहिल्यांदाच यंदा गावदेवाची पालखी गावात कुठेही न फिरता व कुठेही मानावर न जाता शिंपणे होत आहे.
सावर्डे गावच्या श्री देव केदारनाथ ऊर्फ केदार बाजी वरदान देवीच्या पालखी सोहळ्याची सांगता
