खेड:- तालुक्यातील खोपी जाभेल वाडी येथील धनगर बांधवांची चार घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडून सर्व साहित्य जळून खाक झाले या बेघर ग्रामस्थांना येथील उबाठा शिवसेनेच्या वतीने मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली.
खोपी गावात सहयाद्रि च्या पायथा पाशी वसलेली चार घरे २२ मार्च रोजी वणव्याने जळुन खाक झाली, सदर घरातील समाज बांधव पाणी टंचाई व रस्ता सुविधा नसल्याने सदर कुटूंबिय पाण्याच्या ठिकांनी स्थलांतरीत झाले असल्याने जिवित हाणी झाली नाही , परंतु घरे जळुन खाक झाल्याने घरातील अन्न धान्य,कपडे , भाडी ग्रह उपयोगी सामान काहीच राहीले नाही, फक्त जळलेले अवशेष राहीले आहेत. सदरची चार कुटुंबांचे संसार बेघर झाले आहेत त्या मध्ये .पार्वती बबन ढेबे, रंजना ल. ढेबे, लक्क्षमी जानु ढेबे , मोहन जानु ढेबे यांचया घराचा समावेश आहे
या ग्रामस्थांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुखा प्रमुख दत्ताराम भिलारे, माजी नगर सेवक गटनेते बाळा खेडेकर शाखाप्रमुख सागर मोगेरे युवा उद्योजक मंदार शिर्के, तसेच युवा सैनिक सचिन उर्फ बबलू सकपाळ यांनी घटना स्थळी जाऊन भेट घेतली व उद्धब बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून तेथील लोकांना मदत केली.