रत्नागिरी:-सोमेश्वर येथील सोमेश्वर शांतीपीठ विश्वमंगल गोशाळेला डीआरडीओचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अशोक नगरकर यांनी भेट दिली.
या गोशाळेमध्ये रत्नागिरी शहरातील भटक्या बेवारस गाईगुरांची व्यवस्था करण्यात आली आहे.अशा गाईगुरांना पाहण्यासाठी आणि त्यांची देखभाल कशी चालली आहे, हे जाणून घेण्यासाठी खास पुण्याहून डॉ. नगरकर आले होते. त्यांनी भेटीदरम्यान गोशाळेची पाहणी केली. गुरांच्या संदर्भातील माहिती जाणून घेतली. त्याचप्रमाणे या प्रकल्पांतर्गत गोविज्ञान केंद्र वृद्धाश्रम योग व निसर्गोपचार केंद्र आणि प्रस्तावित गुरुकुल या उपक्रमांचीही माहिती त्यांनी घेतली. या प्रकल्पाला मी कायमस्वरूपी जोडून घेईन, असे आश्वासन देत त्यांनी समाजामध्ये अशी समाज उपयोगी व लोकल्याणकारी कामे झाली पाहिजेत, असे उद्गार काढले.
यावेळी विनायक हातखंबकर, रवींद्र इनामदार, राजन रहाटे, श्री. पाटील, विलास सावंत, राजेश आयरे उपस्थित होते.