चिपळूण : बुरुमतळी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. रौप्यमहोत्सवानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. पंचवीस वर्षांपूर्वी तत्कालीन नगराध्यक्ष श्री. सुचयशेठ रेडीज व श्री. रमेशभाई कदम यांच्या सहकार्याने चिपळूण नगर परिषद पुरस्कृत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाची सुरुवात झाली. आज हे ग्रंथालयाला शासनाने ब वर्ग दिला आहे. या वाचनालयामुळे बुरमतळी, पाग इ. भागातील वाचकांची मोठी सोय झाली आहे.
आज बुधवार दि. २६ मार्च रोजी सकाळी १० वाजता सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते रौप्यमहोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष श्री. राष्ट्रपाल सावंत, कार्याध्यक्ष श्री. सुनिल खेडेकर व कार्यवाह श्री. सुमेध करमरकर यांनी केले आहे.