लांजा येथील घटना
लांजा:- तालुक्यातील मौजे वाघणगाव येथे रेल्वे ट्रकवरील इलेक्ट्रीक ओव्हर हेड लाईनवरील झाडे तोडताना तोल जावून पडल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना 3 जुलै रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. अंजू मानदेव सिंग (25, सध्या, रत्नागिरी रेल्वेस्टेशन, मूळ झारखंड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजू सिंग हा अन्य कामगारांसोबत वाघणगाव येथील कोकण रेल्वे ट्रकवरील इलेक्ट्रीक ओव्हर हेड लाईनवर आलेली झाडे तोडत होता. यावेळी जाळीवर चढून कोयतीने झाडे तोडत असताना जाळीवरुन पाय घसरुन खाली कोसळला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद लांजा पोलीस ठाण्यात देण्यात आली.