चौपदरीकरणाचे काम सुरू असतानाच तडे गेल्याने नाराजी
संगमेश्वर:(मकरंद सुर्वे) मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संगमेश्वर तालुक्यात सुरू आहे. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने जनतेतून संताप व्यक्त होत आहे. काम चालू असतानाच चौपदरीकरणाला तडे गेल्याने संताप व्यक्त होत आहे.
संगमेश्वर तालुक्यामध्ये चौपदरी करण्याच्या कामाला अगोदरच उशीर झाला असून त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. धामणी ते आरवली दरम्यान केलेल्या चौपदरीकरण्याच्या काँक्रीटला तडे गेले असून काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. चौपदरीकरण करून काही दिवस उलटले आहेत मात्र त्या अगोदरच चौपदरी करण्याच्या काँक्रीटला तडे गेल्याने नक्की चौपदरीकरणाच्या कामाचा दर्जा काय आहे असा प्रश्न वाहन चालकांना पडला आहे