दापोलीतील घटना
दापोली:- तालुक्यातील हर्णे बाजारपेठ येथे टिंगलटवाळी वरून एकाला लोखंडी पक्कडने मारहाण केल्याची घटना 3 जुलै रोजी घडली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरफराज फकीर होडेकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्णे बाजारपेठ येथे फिर्यादी सिगारेट घेण्यासाठी गेले होते. यावेळी सरफराज होडेकर याने फिर्यादी यांना पावसात भिजू नको छत्री घे असे सांगितले. यावेळी फिर्यादी म्हणाले, तू टिंगल खेचू नको, तुला 2-3 वेळा सांगितले आहे. यावेळी सरफराज याने चिडून फिर्यादी यांच्या डाव्या बाजूच्या कानावर पकड्ड मारून दुखापत केली.शिवीगाळ व दमदाटी करून तुला बघून घेतो अशी धमकी दिली. याप्रकरणी फिर्यादी यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार सरफराज होडेकर याच्यावर भादविकलम 324, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.