शेतातून परतताना ऐकण्यास कमी येत असल्याने बसली धडक
संगमेश्वर/प्रतिनिधी:- शेतामधील काम आटपून घरी जातना शेतकरी महिलेचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली. शुभद्रा तुकाराम शितप असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. शुभद्रा हिला ऐकण्यास कमी येत असल्याने तिला रेल्वे आलेली न समजल्याने धडक बसून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. ही घटना शनिवारी संध्याकाळी 6.30 वाजण्याच्या दरम्यान घडली.
याबाबत मुलगा चंद्रकांत तुकाराम शितप याने संगमेश्वर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. साखळकोंड येथील शेतकऱ्यांची रेल्वे रुळाला दुसऱ्या बाजूला शेती आहे. संध्याकाळी काम आटपून सुभद्रा शितप ही घरी निघाली होती. ती रेल्वे रूळ ओलांडत असताना समोरून येणाऱ्या रेल्वेने तिला धडक दिली. या धडकेमध्ये ती जागीच ठार झाली. या घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश गावित, उपनिरीक्षक नागरगोजे, पोलीस कांबळे, कामेरकर, जोयशी, आव्हाड ,कोंदल, पंदेरे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे.