देवरुख:-रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात वाहन हयगयीने चालवून वाहनाच्या अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गँस टँकर चालकावर शनिवारी रात्री देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जनार्दन लक्ष्मण बडे असे आरोपीचे नाव आहे. बडे हा श्री अंबिका ट्रान्सस्पोर्ट कंपनीचा एल. पी. जी. गॅस टँकर घेवून पुणे ते जयगड असा जात होता.
रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील मुर्शी चेकपोस्टपासून सुमारे दीड कि.मी. अंतरावर उतारात रस्त्याच्या विशिष्ट परिस्थिचा अंदाज न घेता टँकर हयगयीने, अविचाराने चालवून स्वत:च्या जीवितास धोका होईल तसेच दारू पिऊन वाहन चालवून वाहनाच्या अपघातास कारणीभूत ठरला आहे. या प्रकरणी टँकर चालक जनार्दन बडेवर देवरूख पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 279, मोटार वाहन कायदा कलम 184, 185 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास देवरूख पोलीस करीत आहेत.