सागरी पोलीस ठाणे सपोनी नाटेचे अविनाश केदारी यांनी केले आवाहन
राजापूर:-पूर तालुक्यातील सागरी पोलीस ठाणे नाटेच्या अंतर्गत येणाऱ्या पोलीस पाटील, शांतता आणि मोहल्ला कमिटीची बैठक नाटे पोलीस स्थानक येथे संपन्न झाली.
आगामी काळात येणारे सर्व धार्मिक उत्सव आनंदाच्या आणि सलोख्याच्या वातावरणात संपन्न व्हावे कोणत्याही भागात कायदा आणि सुव्यवस्था याची परिस्थिती बिघडू नये यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न आणि सहकार्य करावे असे आवाहन तिला मार्गदर्शन करताना अविनाश केदारी यांनी केले.
या बैठकीदरम्यान आंबोळगड पोलीस पाटील करगुटकर आणि सागवे शिरसे चे पोलीस पाटील शिरसेकर यांनी त्यांच्या गावात घडलेल्या गुन्ह्या संदर्भात केलेल्या कामाबद्दल विशेष कौतुक करण्यात आले.
जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या नशेच्या पदार्थांविरोधात जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कडक पावली उचलली असून आपल्या परिसरातील गांजा बाळगणाऱ्या एका इसमावर कारवाई झाली असून त्याच अनुषंगाने सातारा येथील एका व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. गांजा व अन्य नशिल्या पदार्थ संदर्भात कोणत्याही हालचाली आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा असे आवाहनही याप्रसंगी करण्यात आले. तर सर्वसामान्य नागरिकांनी आपली मुले फेविकॉल ,थीनर, सोल्युशन याचा वास घेत नशा करत नाहीत ना याकडेही सजपणे पाहण्याची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या सभेला पोलीस ठाणे अंतर्गत सर्व पोलीस पाटील साक्री नाटेचे माजी सरपंच मलिक गडकरी, मच्छीमार सोसायटीचे वजूद बेबजी, व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते संदेश पाथरे, पत्रकार राजन लाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल चव्हाण, साळवी पोलीस कॉन्स्टेबल सागर कोरे,प्रमोद सुतार, राजू शिरसेकर, हसन हूस्से, राजू कार्शिंगकर आदींसह शांतता, मोहल्ला कमिटीचे सदस्य उपस्थित होते.