लांजा:-तालुक्यातील कोट पाष्टेवाडी येथे हादरवून टाकणारी घटना घडली आहे. आई आणि मुलाची हत्या झाल्याचे समोर आले आहे. या घटनेने लांजा तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सोनाली चांडीवडे, प्रणव चांदिवडे (६, कोट पाष्टे वाडी) अशी खून झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत पोलीस कसून तपास करत आहेत. मात्र हा खून बापानेच केल्याचा संशय व्यक्त होत आहे.