मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते झाले टीशर्टचे अनावरण
गुहागर/इकबाल जमादार:-महाराष्ट्रचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार गुहागर तालुक्यातील रखडलेली कामे मार्गी लावणे व तरुणांना नोकरी व व्यवसाय संधी उपलब्ध व्हावी म्हणून सदैव झटणारे युवानेतृत्व म्हणजेच कोंकणचे सुपुत्र ॲड.विराज महामुणकर ( युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा प्रमुख) यांच्या मार्फत गुहागर विधनसभा मतदारसंघात विविध गोविंदा पथकांना टीशर्ट वाटप करण्यात आले.

या उपक्रमाला गुहागर मधील तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाला व सर्वांनी त्यांचे आभार देखील मानले . दरम्यान गुहागरचा विकास हा एकच ध्यास डोळया समोर ठेवून कार्यरत असलेले श्री ॲड.विराज महामुणकर अल्पावधीतच येथील तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत विकासात्मक बाबींवर लक्ष केंद्रित करून तरूणांना उभारी देण्या साठी आपला प्रयत्न असणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले त्यांच्या या कार्य पद्धतीने भारावून अनेक तरुण आकर्षित होत आहे यामुळे संघटने ला बळ मिळत आहे या पार्श्वभूमीवर विकास कामे अन तरुणांना नोकरी व व्यवसाय संधी उपलब्ध व्हावी म्हणून त्या दृष्टीने आपला प्रयत्न असल्याचे ही त्यांनी सांगितले
यावेळी जिल्हाप्रमुख शशिकांत भाई चव्हाण, युवा राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य विराज म्हामुणकर, जिल्हा युवा समन्वयक सोहेल बामणे, तालुका प्रमुख खेड अरविंद चव्हाण, तालुका प्रमुख चिपळूण शरद शिगवण, तालुका प्रमुख गुहागर दिपक कनगुटकर, युवासेना खेड तालुका प्रमुख सुरज रेवणे, उपतालुका प्रम ख खेड संदिप आंब्रे, गुहागर शहर प्रमुख निलेश मोरे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख संचित काते, युवासेना जिल्हा संघटक अमरदिप परचुरे, गुहागर सचिव संतोष आंग्रे, तालुका संघटक प्रल्हाद विचारे, तालुका समन्वयक नारायण गुरंव, गुहागर विधानसभा युवासेना निरीक्षक अनुराग उत्तेकर, युवासेना तालुका प्रमुख रोहन भोसले, आनंद भोजने, युवा सेना सचिव सागर गुजर आदींसह गावागावातुन सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.