ग्रामीण वार्ता टीमकडून श्री.उदय दणदणे हार्दिक शुभेच्छा..
गुहागर:-तालुक्यातील निवोशी गावचे सुपुत्र,सामजिक कार्यकर्ता तसेच ग्रामीण वार्ताचे पत्रकार,उदय गणपत दणदणे यांना सामाजिक तसेच पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्यप्रति अखिल भारतीय मानव विकास परिषद (महाराष्ट्र राज्य) व महाराष्ट्र न्यूज-18 “आदर्श भारतीय राजदूत अवॉर्ड” (Indian Ambassador) इंडियन ॲम्बेसेडर राज्यस्तरीय पुरस्कार-२०२३ जाहीर झाला आहे. सदर
हा वितरण सोहळा कार्यक्रम रविवार ,दिनांक-१० सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वा. महाराष्ट्र कामगार कल्याण भवन,कन्नमवार नगर-१ विक्रोळी (पूर्व) मुंबई-८३ येथे प्रमुख मान्यवर नरेश म्हस्के(मा.महापौर ठाणे मनपा), पवन अग्रवाल (मॅनेजमेंट गुरू), संतोष चौधरी उर्फ दादूस (बिगबॉस फेम), सुवर्णताई करंजे(मा.विधी समिती अध्यक्ष) यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र न्यूज-18 समूहाचे मुख्य संपादक संजय भोईर व सह संपादिका पूनम पाटगावे यांनी दिली.
उदय दणदणे गेली अनेक वर्षे पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक, कोकण कलाक्षेत्र, ग्रामीण समस्या यावर सातत्याने आवाज उठवून सदर समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात. समाज पटलावर त्यांच्या अनेक बातम्या ह्या लक्षवेधी ठरत असतात.कोकणातील नमन व जाखडी लोककलांना व लोककलावंताच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या प्रामुख्याने नमन लोककला संस्था( कार्यक्षेत्र-भारत) व कलगी तुरा समाज उन्नती मंडळ- मुबंई व अन्य संघटनांच्या कृतिशील प्रयत्नाना यश मिळावा यासाठी सदर संस्थाच्या प्रत्येक उपक्रमाची दखल घेत आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून त्या सरकार तसेच प्रशासकीय यंत्रणे पर्यंत पोहचाव्यात यासाठी ते नेहमी अग्रेसर असतात. अशा विविध कार्याची दखल “भारतीय मानव विकास परिषद व महाराष्ट्र न्यूज १८ ह्या समूहाने दखल घेऊन इंडियनॲम्बेसेडर २०२३ राज्यस्तरीय पुरस्कार प्रति निवड झाल्याबद्दल पत्रकार उदय दणदणे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन-शुभेच्छा सह कौतुक होत आहे.